About Usविचारवेध ही 1993 मध्ये महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंतांनी एकत्र येऊन उभी केलेली चळवळ. महाराष्ट्रात ठिकठिकाणी 15 वार्षिक संमेलने भरवून झाल्यानंतर तिचे कार्य थांबले. आज परत एकदा विचारवेध संमेलन भरवण्याची तातडीची गरज भासली – कारण आत्ताच्या असहिष्णू, मनगटशाही, राडाबाजी आणि बंदी आणि खून यांच्या वातावरणात निर्भयपणे विचार मांडण्यासाठी एका व्यासपीठाची गरज आहे. आज सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक या संविधानातील मूल्यांची जाणीव स्वताला आणि समाजाला करून देण्याची वेळ आली आहे. विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचा अधिकार हे रक्षण करण्यासाठी, त्यांचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज बराच काळ रहाणार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी निर्भीड आणि सखोल विचारमंथन करण्याचा विचार–वेध संमेलनांचा ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी विचारवेध संमेलने पुन्हा सुरु केली.
 

आत्तापर्यंत झालेली संमेलने:


2017: भारतीय राष्ट्रवाद
2018: शिक्षण
2019: रोजगार निर्मिती आणि विषमता निर्मूलन
2020: जगतिकीकरणात भारताची जडण घडण

तसेच विचारवेधतर्फे दर वर्षी निबंधमंथन ही निबंध स्पर्धा घेतली जाते. 2019 मध्ये घेतलेल्या निबंधमंथन स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून 1200 निबंधांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातील पहिल्या दहा क्रमांकांच्या निबंधाची पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली.

याचबरोबर आणखी एक महत्वाचे व सातत्याने सुरू असलेले कार्य म्हणजे विचारवेधचे YouTube चॅनल. या माध्यमातून गेली तीन वर्षे विविध सामाजिक विषयांवर छोटे व्हिडीओ तयार करून ते सर्वाना पहाण्यासाठी प्रकाशित केले जात आहेत. आज मितीला असे ३०० (तीनशे) हून अधिक व्हिडीओ प्रकाशित झाले आहेत. विचारवेध मधील विषयांमध्ये जास्तीत जास्त वैविध्य असावे, विषय जीवनाच्या, जगण्याच्या प्रश्नांशी निगडीत असावेत असे प्रयत्न असेल. वक्ते त्या विषयातील अभ्यासू, जाणकार लेखक असावेत असाही प्रयत्न असेल. वक्ते सर्व विचारधारा, धर्म, जाती, लिंग, वयोगट आणि प्रदेश यांच्यामधून येतील यासाठी विचारवेध प्रयत्नशील राहील. संमेलनातील वक्ते आणि विषय ठरवण्याची पद्धती ही ‘लोकशाही’ आणि ‘पारदर्शी’ आहे. संमेलनातील वक्ते हे वैचारिक मासिकांच्या वाचकांनी, लेखकांनी आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी सामुहिकपणे ठरवावेत अशी निर्णय प्रक्रिया उभारण्यात आली. विचारवेध मध्ये माहिती आणि प्रसारण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून; विकेंद्रित पद्धतीने सहभाग शक्य करावा असा प्रयत्न राहील.

विचारवेधला राजकीय पक्षांची आवश्यकता आणि सक्रीय राजकारण करण्याची गरज पूर्णत: मान्य आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी विचारवेध मधे सहाभागी व्हावे, विचार मांडावेत, ऐकावेत, चर्चा करावी. पण विचारवेध हा राजकीय सत्तास्पर्धेचा आखाडा होऊ नये यासाठी राजकीय पक्षांचे नेते आणि प्रवक्ते यांनी विचारवेधच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये अशी विचावेधची भूमिका आहे.

विचारवेध मधे व्यक्त होणारे विचार सामाजिक, राजकीय आणिक आर्थिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संशोधकांना आणि कार्यकर्त्यांना उपयोगी ठरावेत असा विचारवेधचा उद्देश आहे. पण विचारवेध हे निव्वळ वैचारिक घुसळण करण्याचे व्यासपीठ राहील. विचारवेध स्वत: दुसरा कोठलाही रचनात्मक किंवा संघर्षाचा कार्यक्रम राबवणार नाही. विचारवेध सर्व समविचारी संघटनांशी मैत्रीचे संबंध निर्माण करण्यात पुढाकार घेईल आणि त्यांच्या कडून मिळणाऱ्या सहकाराचे स्वागत करेल.

विचारवेध असोसिएश ही ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चालणारी नोंदणीकृत संघटना आहे. विचारवेध असोसिएशन शासकीय किंवा परदेशी संस्थांकडून मदत घेत नाही. वैचारिक घुसळणीचा व समाजशिक्षणाचा हा उपक्रम नेटाने पुढे नेण्याचा विचारवेधचा संकल्प आहे. त्यासाठी तुमचा हातभार आवश्यक आहे. विचारवेधला दिलेली देणगी ही Income Tax कायद्याच्या 80G अंतर्गत सवलतीस पात्र आहे
 

Our Team:

Advisors - Anand Karandikar, Sarita Awad, Jayshree Kale, Vishwas Kale, Vinayak Pandit, Mohan Des, Vivek Purandare, Mukta Purandare, Anant Phadake and many more...

Social Media Marketing Manager - Asim Awad

Video Production - Gaurav Kalyani

Volunteers - Aniket Salve, Triveni Gavhale Bhushan Bhujbal and many more.