विचारवेधकरिता लिहिण्याचे आव्हाहन !

विचारवेधकरिता लिहिण्याचे आव्हाहन !

Vicharvedh    May 01,2020 - Other


विचारवेधची वेबसाइट नव्याने सुरू झाली आहे.  यानिमित्ताने आता youtube वरील व्हिडिओ सोबतच लेखही प्रसिद्ध करणे शक्य आहे. ज्यांना आपले (नवे) लेख विचारवेधच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करवायचे असल्यास, त्यांच्यासाठी आता हे व्यासपीठ खुले आहे. व्हिडिओ प्रमाणेच लेखनामार्फतही वैचारिक घुसळण व्हावी व तसेच निबंध लेखन कौशल्याला चालना मिळावी हा यामागचा हेतु आहे. तर आम्हाला आपले लेख नक्की पाठवा.

 

काही महत्वाच्या सूचना:

 1. लेखांना विषयांचे कोणतेही बंधन नाही परंतु, ते विचारवेधच्या भूमिकेशी सुसंगत असावेत. हिंसेचा प्रचार करणारे, बदनामी करणारे, खोटी माहिती पसरविणारे तसेच द्वेषयुक्त लेख प्रसिद्ध केले जाणार नाहीत. तुम्ही पाठवेलेले लेख आधी विचारवेधच्या editorial कमिटी कडून वाचले जातील. ते आवडल्यास, गरजेनुसार त्यात बदल करून / संपादित करून ते प्रसिद्ध केले जातील. अंतिम निर्णय विचारवेधच्या editorial कमिटीचा असेल.
 2. लेखाची शब्द मर्यादा २०००-३००० शब्दांपेक्षा जास्त असू नये.
 3. लेख शक्यतो मराठीत असावे पण क्वचित इंग्रजी लेख चालतील.
 4. लेख हे अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत लिहिलेले असावे. ते Wikipedia प्रमाणे फक्त माहितीचा साठा न होता त्यात लेखकाचे विश्लेषण, विचार, मते, अनुभव इत्यादि येणे आवश्यक आहे.
 5. लेखात आलेलेल्या महत्वाच्या माहितीचे, आकडेवारीचे शक्यतो reference पुरवावेत.
 6. लेखास पूरक अशी काही चित्रे, लिंक्स जर उपलब्ध असतील तर तीही आपल्या लेखासोबत पाठवावीत.
 7. लेख पाठवताना शक्यतो type केलेल्या word file च्या स्वरुपात पाठवावे.
 8. लेखासोबत तुमचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाइल नंबर सुद्धा असावा. प्रसिद्धीपूर्वी लेखात गरजेनुसार बदल करण्याची आवश्यकता असल्यास लेखकाशी संपर्क करण्यासाठी ते महत्वाचे आहे. लेख प्रसिद्ध करताना लेखकाच्या नावाव्यतिरिक्त इतर संवेदनशील माहिती (लेखकाच्या परवानगी शिवाय) प्रसिद्ध केली जाणार नाही.
 9. लेख पाठवण्यासाठीचा ईमेल – vicharvedhindia@gmail.com

Comments

 1. Nandkishor Arvind Dhekane- Jun 07,2020

  Mobile Number : 9665036399 E-Mail ID : Nandkishordhekane2020@outlook.com

What’s hot